साहस
साहस
नको घाबरू मुळीच तु, साहस असते मोठी गरज
लबाड ह्या जगात तु, हरवू नको असचं सहज
संकटसमई ढाल असे , पाठीशी रक्षण करी
लढाई नां जरी बळकट तुझी , पण वार कशाचेही तारी
साहस करता भीती पळते, तन मन धन मजबूत करते
मनी तुझ्या तु सदाच बाळग, जीवन उमेदीने भरते
मोकळा श्वास साहसाचा, रस्ता असतो हा यशाचा
खरा आरसा तुझ्या रूपाचा , संहार करी तो अंधकाराचा
