साद
साद
तूच घातली सखे मला, प्रेमाची या साद
अजान अंतरी माझ्या मनाला लावलास तू नाद
स्वप्न पुर्तीच्या मनी तुझ्यासवे घेतलास आस्वाद
पुरता हरपुन गेलो सखे, तुझ्यात मी मनमुराद
हिंदोळ्याच्या या वळणावर का स्फुरला उन्माद
प्रेमाच्या या भरतीमध्ये तू उफळलस का वाद
असा कसा गं नाही तुजला, माझ्यावरती प्रमाद
सुखदुःखाच्या वाटेवरती, मीच तुझा प्रासाद
घात प्रेमाचा केला म्हणूनी, तू बडवितेस पखवाद
प्रेमवेड्या या जिवास माझ्या, तू केलेस बरबाद
का आयुष्यातून तुझ्या ग मज केले अलगद बाद
ज्योत प्रेमाची अजुनही फुंकतो, सखे देशील का ?प्रतिसाद..

