STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

रयतेचा राजा शिवछत्रपती.....

रयतेचा राजा शिवछत्रपती.....

1 min
319

रयतेचा राजा शिवछत्रपतींची

सातासमुद्रापार किर्ती पसरली

दुमदुमला अवघा महाराष्ट्र

रयतेला असा लाभला वाली

    महाराष्ट्राची अस्मिता

    रणगाजी शिवाजींनी जपली

    हिंदवी स्वराज्य संस्थापक

     हि छवी प्रत्येक मनात रुजली

 संतांच्या पदस्पर्शाने पावन ही धरा 

तुकोबारायांनी लिहिल्या गाथा 

शिवाजीची तलवार लखलखली

तुकोबांच्या चरणी नतमस्तक माथा

    तुकोबारायांच्या अभंगवाणीने

    सद्विचारांचा दिला अनमोल ठेवा

    अशा थोर संतरत्नाच्या पायी         

    महाराष्ट्र चाखतो भक्ती- भावाचा मेवा

अलंकार उपाधी नको साधूस

भावभक्ती तेवढी अर्पण करा

एवढ्यावरच तृप्त संतमंडळी

सद्विचाराने आचरण करा

    एक महाराष्ट्राचा महामेरू

    एक संतचरित्राची खाण

    अवघ्या महाराष्ट्रात रुजले

    मराठी अस्मितेचे वाण

धन्य धन्य ते शिवाजी

धन्य धन्य महाराष्ट्राची धरा

संतरत्न अन् संरक्षक राजा 

पाहिला महाराष्ट्राने सारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational