रविवार...!
रविवार...!
र ग अंगात
वि चार डोक्यात
वा रे संचारते तनात
र विवार येता मनात....
वेगळाच रंग
वेगळाच ढंग
वेगळे मनोरथ
वेगळेच स्वप्न
वेगळी सुरुवात
गुंजे अंतरात...
पाय चालती
स्वप्नाची त्या वाट
जीवन सारीपाट
खेळण्यास...
सुरेख जीवन
सरते गात कवन
होतो मी पावन
श्रीरंग पाहून...
उधळले तेज
साठते अंतरात
न्हाहतो मनसोक्त
कोवळ्या उन्हात...
र विवार सुट्टीचा
वि ना तक्रार जातो
वा जत गाजत जेव्हा
र वी माझ्या दारात येतो...!
