रुसलेल्या पाऊस
रुसलेल्या पाऊस
धोधो धोधो बाप रे!
किती पडतोय
कोणी रगावल का
किती बरसतोय
काही चुकलं का माझं
की तिच्यावर रुसतोय
झाल का तुमचं भांडण
का इतका तू रडतोय
नाही रे वेड्या काही
रुसण्यात मजा
मनात सारखी हुरहुर
आणि जीवाला सजा
माफी आधी तूच मागून
दोघे प्रेमानी बसा
लाडी गोडीने बोलून
खुदुखुदु हसा

