रोबोट
रोबोट
हो बाळा रोबोटेच म्हणतात याला
मज कडूनी हा उपहार तुला
नाही हे फक्त खेळणे तू जरा समज
ही तर होणार आहे काळाची गरज
जिवाभावाची माणसे जात आहेत फुलांप्रमाणे गळून
सांग कुणा समवेत राहशील तू मिळून-मिसळून
मनातील गोष्टी सांगशील कोणाला
म्हणूनच हो तू संशोधक आणि बनव अशाच रोबोला
विकसित कर तू यास वापरून आता तंत्रज्ञान
हाच होईल डॉक्टर, नर्स आणि हाच देईल बालकांस ज्ञान
