STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational

रणरागिणी - सुतगिरणीची

रणरागिणी - सुतगिरणीची

1 min
244

केला प्रहार तिने त्याच्या मानगुटीवर,

गेली धावून वाघासारखी ती त्याच्या अंगावर...

सांगा त्या माऊलीचं काय चुकलं ?

बहिणीला छेडणाऱ्या त्या नराधमाला तिने धु-धु धुतलं...!


फोडली पाहिजेत डोकी जाग्यावरच अशा नराधमांची

वाहवा होतेय आज तिच्या करामतीची...

काय बिशाद त्याची पुन्हा, कोणा बहिणीच्या नादाला लागल,

बहिणीला छेडणाऱ्या नराधमाला धुवायला, अजून एक रणरागिणी धावल....!


करा आपल्या लेकींना इतकं सक्षम की,

करू शकतील स्वतःच - स्वतःच रक्षण...

वेळ पडली तर एखादा दगड उचलून घाल

येणाऱ्या काळात आपण, अशाच रणरागिणी पहाल...!


औरंगाबाद-सुतगिरणीला ही शुरपणाची घटना घडली

बहिणीला वाचवून तिने भविष्याची हमी दिली...

कोण डोळे वर करून बघेल तिच्या घराकडे आता ?

घेतलाय तिने आपल्याच घराच्या रक्षणाचा वसा...!


असेच टवाळखोर जागोजागी मिळतील खरे,

आपल्या लेकींना स्व-रक्षणाचे धडे दिलेले बरे...

केला जर कोणी तोंड उचकटवून अरे ला कारे,

तर, अशीच धुलाई करून त्याचा यथेच्छ सन्मान करा रे...


आम्ही आहोत नारी पण वेळेला पडतो भारी,

पेटून उठायला हवं आता, संपवायला हवी ही मिजासगिरी...

आत्मरक्षण कराया, या दोन माउलींनी शिकवलं,

बहिणीला छेडणाऱ्या त्या नराधमाला तिने धु-धु धुतलं...


त्या हरामखोरांना तिने आयुष्यभराचा धडा शिकवला,

आजचं खतरनाक दृश्य, तिचा रुद्रावतार साऱ्या बघ्यांनी पाहिला...

घाबरायचं नाही, अन्यायाला बळी पडायचं नाही, फक्त लढायचं,

हा एकमेव पायंडा आज त्या रणरागिणीने घालून दिला...


तुझ्या किर्तीचा डंका माऊली दाही दिशा घुमूदे,

तुझ्या आत्मरक्षणाची समशेर, अशीच या नराधमांना पालथी घालू दे,

अशा शूर रणरागिणीचा अवतार लिहिण्या भाग्य मज लाभले,

तिच्या शूरतेच्या पराक्रमाने माझे काव्यमय शब्द, कविता-रुपी सजले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational