रंगपंचमी
रंगपंचमी
आयुष्य आपले सारे,
रंगपंचमीचा सण,
रंग खेळा आवडीने,
जिवेभावे मनोमन..!१!
पेटी भारी ही रंगाची,
वाहते हो ओसंडून,
निवडून तुम्ही घ्या हो,
नका करू आनमान..!२!
रंग खेळता जीवनी,
कधी कुठला सांडेल,
नाही येणार अंदाज,
कधी कसा मिसळेल..!३!
चित्र रंगवू आपले,
हर्षभरे आनंदात,
नको रंगाचा बेरंग,
दुसऱ्याच्या जिंदगीत..!४!
नवरंगी मोर पीस,
प्रति क्षण आयु जणू,
जपू हृदयी नित्य,
प्रिय राधा कान्हा वेणू..!५!
रंग उधळूया चला,
सुख समृद्धी वाढवू,
सप्तरंगी इंद्रधनू,
सर्व जगात रंगवू..!६!
