STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy Inspirational

3  

Pandit Warade

Tragedy Inspirational

रंगभूमी

रंगभूमी

1 min
761


हे जीवन एक रंगभूमी आहे

प्रत्येक व्यक्ती रंगकर्मी आहे 


आयुष्य हे तीन अंकी नाटक

जन्म पहिल्या अंकाचे फाटक


बालपणचा रम्य अंक पहिला

क्रीडा करता क्रीडेतच संपला


अंक दुसरा मादक तारुण्याचा

या यौवनी पडे विसर विश्वाचा


वृद्धावस्था अंक तिसरा सुरू

या काळी स्वानुभव हेच गुरू


भूमिकेशी मना समरस व्हावे

स्वत्वाचे भान न विसरू द्यावे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy