रंगात तुझ्या
रंगात तुझ्या
रंगात तुझ्या अंगअंग रंगू दे..
सखे, आज संग होळी खेळू दे..!!
लाल चुटुक ओठाची, लाली ओठी रुजू दे..
अंग अंग तुझं सखे, आज रंगी भिजू दे...
पापणी डोळ्यांची तुझ्या, हळूच खाली वळू दे...
सखे, आज संग होळी खेळू दे..!!
खळीदार गालांचा, गुलाल गाली खुलू दे..
बघुन तुझ्या रंगास, मन माझे भुलू दे..
लोचनात स्वप्न नवे, सप्तरंगी फुलू दे..
सखे, आज संग होळी खेळू दे..!!
नील रंगी नयनांची, निळाई मज पिऊ दे..
नजरेने पाज सखे, आज नशा होऊ दे..
मदहोश मी रंगात, तोल जरा ढळू दे..
सखे, आज संग होळी खेळू दे..!!
रंगात तुझ्या अंगअंग रंगू दे..
सखे, आज संग होळी खेळू दे..!!

