रंगांची किमया
रंगांची किमया
रंगांच्या दुनियेतली ही रंगीली प्रजा,
सारेच आनंदी येथे कोणा ना सजा.
नाते कोणाचे अंबर अन सागराशी,
तर जवळीक कोणाची या निसर्गाशी.
कोण करी प्रतिनिधित्व प्रकाशाचे,
तर कोण दाखवी भय अंधाराचे.
कोण देई संदेश असा हा शांतीचा,
कोण सांगे इतिहास रक्तरंजित क्रांतीचा.
गुलाबी, केशरी, पिवळा नी जांभळा,
लाल, हिरवा, पांढरा अन निळा.
संगतीत यांच्या काळ्यास ना थारा,
आरोग्यासाठी नका वापरु पारा.
सण होळीचा अन् उधळण रंगांची,
नसावी फिकीर कोणा येथे प्रेमाची.
