रंग सोहळा
रंग सोहळा
वीस ऑक्टोबर 2023...!
रंग सोहळा....6
हिरवा हिरवा गार शुक्रवार...!
हि ला म्हंटल जरा
र डवा चेहरा हसरा कर
वा टलंच तर
ही ही करीत हात धर....
र स्त्याने जाताना
वा मांगी होऊन चाल
गा लातल्या स्मितहास्याने
र मत गमत फुलव गाल...
शु क्राच्या चांदणीची झलक दाखवून
क्र यशक्ती जरा वाढवून बघ ,(प्रतिक्रिया उमटली)
वा टलंच मला तुम्ही हेच बोलणार
र स्त्याने जाताना पण तमाशाच करणार...!
मी गप्पचं
मग हिरवा थवा हळू हळू सरकला
म्हंटले तेवढाच विरंगुळा लाभला
हिरवळ फुलली आईच्या महाद्वारी
जावे वाटेना माघारी...!
शुभ सकाळ...!
