रंग पिवळा
रंग पिवळा
हळद पिवळी लेवून
सूर्यफुले हे डोकावती
हिरव्या पानांमधुनी जणू
मोती ते चमकती
रंगांची ही जादू न्यारी
सजली धरती ही प्यारी
विविधतेने नटलेली
एकजुटीने नांदती सारी
आनंद जगण्याचा वाढवूया
गुढी हर्षाने उभारूया
जल्लोषाने संस्कृती
उत्साहात साजरी करूया
