Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा

1 min
181


रंगुनी रंगात साऱ्या 

असे रंग हा वेगळा 

गुंतुनी गुंत्यात साऱ्या 

पाय असे हा मोकळा ||१|| 


रंगीबेरंगी आयुष्य 

मिश्रण सारे रंगाचे 

होळीतील रंग पहा 

सूर येती बासरीचे ||२||


लाखात मी ही साजरी

जन्म हा माझा आगळा 

प्रत्येक रंगी रंगतो 

रंग माझा हा वेगळा ||३|| 


आकाशी या पक्षासम 

लक्ष असे नभी जरी 

कणखर मी खंबीर 

दृष्टी असे पिलांवरी ||४|| 


लाल रंग हा शौर्याचा 

पराक्रम हा आगळा 

रंगातूनी उमटतो 

रंग माझा हा वेगळा ||५|| 


Rate this content
Log in