रंग जीवनाचे
रंग जीवनाचे
रंग जीवनाचे नानाविध छटांचे
नवरसानी, नवरंगानी बहरलेले।
गुलाबी रंगाच्या प्रेमात नहात
लाजते मी सुखाच्या पदरात।
लाल रंगाची भव्य दिव्य शक्ती
देते मज जीवन जगण्याची वृत्ती।
केशरी रंग त्याग सांगतो
सामाजिक बांंधीलकीशी नाते जोडतो।
पांढरा रंग पवित्रता, चारुता देतो
मनास माझ्या पावन उर्मी देतो।
हिरव्यागार रंगाने मन मोहरते
सुखी आयुष्याची स्वप्ने सजवते।
मातेच्या प्रेमाचा रंग गहिरा
मज देतो मायेचा क्षण साजरा।
प्रियकराच्या मधुर प्रेमरंगात
नहाते मी यौन प्रेमसागरात।
शिक्षकांच्या शिस्तप्रिय रंगात
टाकते आत्मविश्वासाने पाऊल जगतात।
अनोखे रंग बावरे जीवनाचे
फुलविते आयुष्य माझे आनंदाचे
