रंग हिरवा
रंग हिरवा
वनराईचे वन वैभव
खुणावते सदा मजला
सदाहरित जीवन जगणे
आशिष मिळो तुजला
जीवनात घ्यावा संकल्प
झाडे लावा झाडेे जगवा
निसर्गच शिकवत जाई
आयुष्य स्वतःचे घडवा
हिरवळ पसरवते सदा
शांतता जीवनात
निसर्गाचे पाळूून नियम
आनंद पसरवा मनात
