STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

4  

UMA PATIL

Inspirational

रंग गुलाबी

रंग गुलाबी

1 min
24.1K


पाटलाच्या डोळ्यांत नशा शराबी...नशा शराबी.....

पाटलाच्या प्रेमाचा रंग गुलाबी...रंग गुलाबी.....॥धृ॥



लई दिसांनी आमची झाली भेट

अन् पाटील मनात घुसला थेट

कसदार देहाच्या नागमोडी वाटा

तूफानी सागरात उठतात लाटा.....॥१॥



देहाला मिलनाची लागली आस

श्वासांत मिसळू द्या आता श्वास

माझ्या जीवाला लागली हूरहूर

मनामधी दाटते शंकांचे काहूर.....॥२॥



ज्वानीच्या आगीचा पेटलाय वणवा

येऊनी जवळी, तुम्ही आग शमवा

आता अंधारली बघा सारी रात

रातीत होऊ द्या पिरतीची बात.....॥३॥



चंद्राची झाली आता चांदणी

गाऊया दोघे मिलनाची रागिणी

कृष्ण - राधा एकमेकांत दंग

पाटलाच्या प्रेमाचा चढला रंग.....॥४॥



पाटलाच्या डोळ्यांत नशा शराबी...नशा शराबी.....

पाटलाच्या प्रेमाचा रंग गुलाबी...रंग गुलाबी.....


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from UMA PATIL

जिंकायला

जिंकायला

1 min വായിക്കുക

आजी

आजी

1 min വായിക്കുക

भूत

भूत

1 min വായിക്കുക

कविता

कविता

1 min വായിക്കുക

होळी

होळी

1 min വായിക്കുക

Similar marathi poem from Inspirational