STORYMIRROR

Tejaswini sansare

Inspirational Others

3  

Tejaswini sansare

Inspirational Others

रमाईची पुण्याई

रमाईची पुण्याई

1 min
264

घरात कोणी आहे का? पत्र आले साहेबांचं, 

मोठ्या हिमतीने पाकीट फोडलं, 

डोळ्यातून अश्रू गळू लागलं.......!!  


दुर्गा मावशी आता मी काय करू? कसं सांगायचं? 

साहेबांनी ४० रूपये पाठव असं लिहिलंय, 

नाहीतर मला परीक्षेला बसू देणार नाय, 

पोस्टमन म्हणाला तुमच्या समाजाकडून मागायचं.......!!  


समाजाकडून मागायला काय लाजायचं, 

दादा माझा समाज गरीब आहे, 

कुठून देतील एवढा सारा पैसा, 

मग धुणीभांडी करा लोकांची त्यात काय लाजायचं......!! 


दादा मी मानी पुरुषाची बायको, 

मगं पोय बावडी येथे शेण, 

गोळा करून गवऱ्या थापायच्या, 

कुणापुढे झुकणे वाकणे नको......!!  


आज ३० गवऱ्या थापल्या, 

उद्याच्या ६० गवऱ्या थापल्या, 

गवऱ्या विकून ४० रुपये जमविले, 

कष्टाने पैसे कमविले......!!  


शिफारत रमाची चाळीस रुपयाची,  

बाबांना विलायतेला मनीऑर्डर केली,

साहेबांनी बॅरिस्टरची परीक्षा दिली,

रमा मी बॅरिस्टरची परीक्षा पास झालो कमाल रमाची......!! 


रमा मी तुझ्या हाताला तेल लावून मालिश करीन,

बाबांच्या डोळ्यातून टपटप अश्रू पाझरले, 

डोळ्यातील पाणी हे वाट मिळेल तिकडे धावू लागले, 

तुझे उपकार मी कसे रमा फेडीन.....!!  


भर उन्हात शेण गोळा करून तू गवऱ्या थापल्याचं, 

तुझ्यासारखी बायको मिळाली,

म्हणून मी बॅरिस्टर झालो रमा,

तुझ्यामुळे मी घडलो बोल हे भीम बाबाचं.....!! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational