STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
242

बहीण भावांच्या प्रेमाचा

सण राखीपौर्णिमेचा

प्रेम माया गुंफिते बहीण

रेशीम धाग्यांत राखीच्या


बहीण येते भावाकडे

राखी गोडधोड घेऊन

औक्षण करुन भावाला

रक्षाबंधन गोड देऊन


प्रेमाची देवघेव अनोखी

आवडती वस्तू ताईला

आनंद मनात माईना

भर चेष्टामस्करीला


सुग्रास जेवण आईने

माय मायेने वाढते

प्रेमानेच जीव तृप्त

लेक गप्पागोष्टीत रमते


अर्पण सागराला नारळ

कोळीबांधव करतात

उद्यापासून मासेमारीला

दर्यावर्दी समुद्रात जातात


राखीचे महत्व सैनिकांना

भगिनी पाठवती प्रेमाने

रक्षण देशाचे करती

अहोरात्र सावधानतेने


श्रावणातले सारे सण

माया ममता गोडीचे

नात्यांचे बंध जुळती

हसतखेळत मायेचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract