STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

रिमझिम पावसात आपण दोघी

रिमझिम पावसात आपण दोघी

1 min
140

रिमझिम पावसात

आपण दोघे न्हाऊ

चिंबचिंब भिजताना

आभाळ कवेत घेऊ


सळसळ वाऱ्या संगे

धावत आपण जाऊ

छेडणाऱ्या वादळाला

हाकलून लाऊ


उंच उंच डोंगरावरून

झरे झिरणे वाहतील

तुझ्या माझ्या अवतीभवती

फुलपाखरे खेळतील


खेळणाऱ्या पाखरा संगे

दुर दुर जाऊ

हिरव्या हिरव्या रानातला

रानमेवा खाऊ


ओल्या ओल्या मातीतले

दव टिपत जाऊ

लाडावलेल्या कळ्यांना

उमलतांना पाहू 


तुला मला पाहून

मैना गाणे गातं जाईल

गाण्याच्या सुरामध्ये

पाणी वहात राहील


वाहणारे पाणी आपण

अंगावर घेऊ

झुळझुळ मंजूळ

आवाज ऐकत राहू


माळरानात मोर

नाचताना पाहू

रूप त्याचे देखणे

डोळ्यात भरून घेऊ


पानफुले हिरवी झाडे

शृंगारून जातील

लतावेली अंगाभोवती

पिंगा घालतील


लतावेलींना धरून

झोका घेत जाहू

निळ्याशार आभाळाला

मिठीत आपण घेऊ


 गर्द धुक्यातून

वाट काढत जाऊ

मऊ मऊ हिरवळीवर

मकईभुट्टा खाऊ


दऱ्याखोऱ्यातून शहारे

बेभान होतील

डोंगराच्या पायथ्याशी

सप्तरंग उतरून येतील


सप्तरंगी रंगाना

लपेटून घेऊ

सैरभैर पाखरासंगे

हरवून जाऊ


रिमझिम पावसात

चिंबचिंब होऊ

रंग बदलणाऱ्या ढगांना

खिडकीतून पाहू



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational