STORYMIRROR

Vasudha Naik

Romance Others

3  

Vasudha Naik

Romance Others

रेशमी धुके

रेशमी धुके

1 min
937

प्रातःकाल समयी

निघालो फिरावयास

मी अन् साजणा

थंडीच्या दिवसात...


मस्त हिरो होंडावरून

खंडाळ्याच्या घाटातून

रेशमी धुक्याची चादर

अंगाभोवती लपेटून...


चाललो आम्ही तोर्‍यात

वारा बोलतोय कानात

मस्त रेशमी धुक्यात

जोडी आली रंगात...


सुखाची होतेय बरसात

मी माझ्याच तालात

हसू उमटे हृदयात

या रेशीम धुक्यात...


तहान भूक विसरली

खूप मजा केली

सजणाने साथ दिली

रेशमी या धुक्यात...

रेशमी या धुक्यात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance