STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

रेशमी धागे

रेशमी धागे

1 min
294

हळवे स्पर्श जाणीवेने वेढले ,

जाणिवांच्या आठवांनी गोंजारले,

कधी गुंतले कधी सुटले तुटले,

असे हे रेशमी धागे नात्यांनेच बांधले...


लाल हिरवा निळा पिवळा कोणता रंग यांचा,

रक्तासही पाणी केले रंग सोडून वाहले,

कधी रंगात आणखी गडद झाले ,

पूसता पुसेना मिटता मिटेना,

असे हे रेशमी धागे नात्यांनेच बांधले...


उसवलेल्या मनाला ठिगळे यांनीच जोडले,

जोडता जोडता सुयांनी बोटांना बोचले,

हळहळले छळले आर्त स्वराने म्हणाले,

सोबती रहा अशीच कायमची,

उसवलेले प्रेम शिवले,

तुझ्याशिवाय जीवनात माझ्या रंग ना उरले,

असे हे रेशमी धागे नात्यांनेच बांधलेले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance