रेशमाचे बंध हे
रेशमाचे बंध हे
रेशमाचे बंध हे,
हे कितीक सांभाळू,
सांभाळू ही नातीगोती,
नातीगोती ही कणवाळू.
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
कणवाळू असती फार,
फार ती नाजूक पहा,
पहा बंध रेशमाचे हे,
हे घट्ट साऱ्यांनी विणत रहा,
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
रहा गोडीगुलाबीने सारे,
सारे आपुलकी जपुया,
जपुया आदरसन्मान आपण,
आपण एकजुटीने राहूया.
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
राहू या तत्पर मदतीला,
मदतीला गरजवंताच्या धावू,
धावू समाजकार्यासाठी पुढे,
पुढे देशासाठी हातभार लावू.
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃