रौद्ररूपी सौदामिनी
रौद्ररूपी सौदामिनी
होते आनंद मनाला
पावसात भिजताना |
थेंब पांढरे टपोरे
हातामध्ये झेलताना ||१||
ओलेचिंब झाल्यावर
थंडी भरते अंगात |
नाव घेता सौदामिनी
भिती वाटते मनात ||२||
सूर्य दिसेनासा होई
होई काळोख नभात |
वारा जोराने सुटतो
होतो घर्षण ढगात ||३||
कडाडून सौदामिनी
येती पावसाच्या सरी |
लख्ख प्रकाश पाहून
मनी धडकीच भरी ||४||
पाहुनिया सौदामिनी
अंग अंग शहारतो |
भयावह गर्जनेने
मन माझा घाबरतो ||५||
रौद्ररूपी सौदामिनी
करी जीवाला आघात |
रहा घरी सुरक्षित
नका निघू मैदानात ||६||
