STORYMIRROR

Kishor Zote

Romance Classics

4  

Kishor Zote

Romance Classics

रात्र ( सहाक्षरी )

रात्र ( सहाक्षरी )

1 min
162

काळोखी ही रात्र 

दाटे मनी भिती

उगाच गडद

वाटतेय किती


वाहता हा वारा

आवाज कानात

दूरवर कुठे

डोळे चमकत


नको नको वाटे

एकांत भयान

काहुर मनात

लांबलेले क्षण


अशांत जीवाची

होते घालमेल

प्रत्येक वेळस

काजव्याची सल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance