STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

राष्ट्रीय कर्तव्य

राष्ट्रीय कर्तव्य

1 min
243

मतदारांनो करा मतदान

मतदान आहे राष्ट्रीय कर्तव्य,

तुमच्या हाती आहे खरे 

या देशाचं भवितव्य...


लोकशाहीचे करा जतन

द्या देशाला सुशासन ,

लोकनेता हवा चारित्र्यवान

मतदारांनो करा मतदान...


मतदार राजा तूच खरा

या देशाचा आहेस कणा,

गाढ स्मशानात भ्रष्टांना

राष्ट्रहित तू ठेव ध्याना...


देशद्रोही ना गुंडांची

गरज देशाला आहे एकीची,

महासत्ता व्हावा भारत

इच्छा हीच भारतीयांची...


मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य

मतदारांनो ठेवा ध्यानी,

सत्ता त्यांच्या हाती दया

राष्ट्रहित जो जानेल कोणी...


राष्ट्रीय कर्तव्य संधी मोठी

देशहित आहे तुमच्या हाती,

चोरांना चारावी माती

सत्ता दया सज्जना हाती..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational