STORYMIRROR

Murari Deshpande

Tragedy

3  

Murari Deshpande

Tragedy

राणीचा खजिना

राणीचा खजिना

1 min
265

ब्रिटनमधल्या महाराणीची

गंगाजळी जेव्हा आटली

'कर्म तसे फळ'--

म्हण खरी वाटली


ज्यांच्या म्हणे साम्राज्यावर

मावळताना सूर्य लाजायचा

तिन्ही त्रिकाळ त्रिखंडात

डंका ज्यांचा वाजायचा


पारतंत्र्यात लोटून जगाला

होतं जे जे मिळवलेलं

सूड घेत नियतीनं

तेच नेमकं पळवलेलं


आपलं तेच आपलं असतं

लुबाडलेलं टिकत नाही

मोठमोठी घराणी

तरी काही शिकत नाही !!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy