रांगोळी
रांगोळी
अतिथि स्वागता
सज्ज जाहले अंगण
रंगोळीचे रिंगण
रेखीव.
सुबक, सुंदर
सजे नाना रंगी
विविध ढंगी
आकार.
नटून बसते
जणू अंगणाची राणी
कौतुके साऱ्याजणी
न्याहाळीती.
हसून लाजते
कधी लाजून हसते
कधीच नसते
उदास.
शिकवण एक
रांगोळी देतसे छान
ठेवावे भान
एकतेचे.