रान फुल...
रान फुल...
नभ ओथंबुनी आले
क्षण पावसाळी न्हाले
सर पावसाची झेलत
रान फुल झाले मी
रानी हिरवेगार पाती
मोतिदव बघ झेलती
लेवुनी ती नवकांती
रान फुल झाले मी
चिंब ओली प्रित मनी
दवथेंब झेलती कोणी
अश्या भिजल्या रानी
रान फुल झाले मी
सर पावसाची आली
मने श्रावणी झाली
आली बहरुनी कांती
रान फुल झाले मी
नसे उपमान काही
जनी अवमान नाही
दगडी पठारावरी ही
रान फुल झालें मी
अवखळ जलधारा ती
आवरुनी घेऊ मी किती
मन हे बेफिकीर होती
रान फुल मला बोलती

