राजर्षी शाहूू महाराज
राजर्षी शाहूू महाराज
युगपुरुष युगंधर यशवंतराव
यात्रीबंधू यशपाल युगप्रवर्तनाचे यशोगान
युक्तिमूलक यत्नेश यशवीर युगेश
युयुत्स यज्ञेश युधिष्ठराचा योजला यज्ञ
कागलचे कालातीत व्यक्तिमत्व चिरंतन त्यांचे चिंतन
शीलवंत शिक्षणगुरू शाहू महाराज भूपती श्रेष्ठ
शाश्वत विचारांचे शिखर महाराष्ट्राचा आदर्श नृप
सर फ्रेजरांच्या धडयांतून पुरोगामी विचारांचा घेतात ध्यास
शैक्षणिक कार्याचा ठसा अमीट
समाजसुधारणेचा वसा असिमित
'लोकाभिमुख' राजा जनमाणसांचे विद्यापीठ
अस्पृश्योद्धाराच्या कार्याचे ज्यांनी धडे दिले धीट
शेतकऱ्यांचा राजा मेरूदंड विकासाचा
आर्थिक सुधारणांचा रचला त्यांनी पाया
दूरदर्शीपणाचा चष्मा डोळ्यावर होता
भोगावती नदीवर लक्ष्मीबाई धरणातून वाहिली गंगा
वसतिगृहांचे जनक झाले शिक्षणाचे कनक
आरक्षणाचे पुरस्कर्ते बनले बहुजनांचे उद्धारक
सत्यशोधक समाजाचे व्रत घेतले
समाजसुधारणा चळवळींचे धारिष्टय आले
रयतेचा राजा सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष
राजर्षि छत्रपती शाहू महाराज द ग्रेट एक भेट
