डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर...
ज्ञानरूपी महासागराच्या तळाचा थांग लागत नाही
अथांग पसरलेल्या नभाच्या व्याप्तीची विशालता समजून घेण्याचा महत प्रयास करण्यास कोणीही धजत नाही
मातीशी इमान राखणारे उपजत शहाणपण
आल्याशिवाय जातीव्यवस्थचे क्रूरचक्र संपुष्टात येत नाही
भीमरावांचे कार्य समजून घेताना प्रबोधनाची प्रयोगशाळा कधीच थांबत नाही
पुस्तकांच्या विश्वातून प्रवास करताना असह्य वेदनांचा ससेमिरा
बाबासाहेबांच्या लेखणीतून सदैव 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट'चा पवित्रा
'द प्राब्लेम ऑफ रूपी', 'द अनटचेबल्स', 'कास्टस् इन इंडिया'कडून 'बुध्द अॅण्ड हिज धम्म'कडे जाणारा महू- दिल्ली प्रवास
बुध्दीच्या या अनमोल भारतरत्नाच्या कार्याचे मोजमाप करण्यास ना कोणत्या तराजू वा कोणत्या मोजपट्टीची आहे गरज
भारतीय संविधानाच्या शिल्पकाराची संघर्षातूनच होते ओळख
'मूकनायक' व 'जनता' या समीकरणात नेहमीच 'समता'
'प्रबुध्द भारत' घडविताना 'बहिष्कृत समाज हितकारिणी समाजा'चा 'बोधीसत्त्व' प्रज्ञासूर्य तळपला
महाड,चवदार वा काळाराम मंदिर सत्याग्रह
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ जपले हे आयुष्यभर तत्त्व
'स्वतंत्र मजूर पक्ष' अन् आखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे कार्य सर्वश्रुत
पीपल्स एज्युकेशन सोसायटी, 'सिध्दार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय
अन् सिध्दार्थ विधी महाविद्यालय
इतिहासाच्या सुवर्णपानात अभेद्य व अद्वितीय डॉ. भीमराव आंबेडकर.
