फ्लोरेन्स नाईटिंगेल
फ्लोरेन्स नाईटिंगेल
ध्येयाला जागृत करत होते तिचे आंतरिक मन
साहित्याने फुलले तिचे विचारांचे अंगण
इतिहासाच्या पानाला तत्वज्ञानाची वेल
जीवनाचे गणित सोडविताना संख्याशास्त्राचा प्रकाश
फ्लोरेन्सच्या मातीच्या सुगंधाने
महातरू जगात फ्लोरेन्स नाईटिंगेल द ग्रेट
मनात विचारांचे उठले वादळ
रुग्णसेवेची टाकले झुंजार पाऊल
कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध जाताना
मन कठोर ठेवून विस्तारते हृदयाचा महासागर
दोनशे वर्षानंतरही जिवंत होतो फ्लोरेन्स नाईटिंगेलचा इतिहास
मानवतेचा घेतला अखंड ध्यास
श्वासाश्वासात होता रूग्णसेवेचा प्रवास
क्रिमियन युध्दाचा अटळ फास
जखमी सैनिकांची शुश्रुषा करताना
दिवस -रात्र सेवेचा अट्टहास
अंधारलेल्या वाटांना उजेडाची आस
क्रिमियन युध्दात दिला सैनिकांना श्वास
'द लेडी विद ए लॅम्प' आले सर्वांच्या मुखात
मानवतेच्या मंदिराचे पावित्र्य जगाच्या कानाकोपऱ्यांत
आरोग्यमंदिराच्या पाऊलवाटेला जाताना फ्लोरेन्सचे भेटते पहिल्यांदा गाव
आयुष्यभर जोपासले समाजसेवेचे व्रत
शुश्रुषेचा घेवूनी ध्यास स्वच्छतेचा दिला संदेश स्वप्नांचे विश्व कोरले फ्लोरेन्सच्या मनपटलावर नर्स ट्रेनिंग स्कूल थाटले सेंट थॉमस हॉस्पिटलच्या परिसरात
'ऑर्डर ऑफ मेरिट'ने नाईटिंगेल ऑफ फ्लोरेन्सचा सन्मान
फ्लोरेन्स नाईटिंगेल म्युझियममध्ये उजळतो एक दिव्य लॅम्प.
