STORYMIRROR

Rahul Palke

Inspirational

4  

Rahul Palke

Inspirational

क्रांतीचे पर्व झुंजारते ...

क्रांतीचे पर्व झुंजारते ...

1 min
325

रणांगणाचे चैतन्य चोहीकडे वसते

नभांगणी तिरंगी झेंडयाचे रंग खुलते

त्याग, शांतता, निसर्गसंपन्नतेचे रूप साजिरे

क्रांतीचे पर्व झुंजारते ...


स्वातंत्र्याचे लढे स्मरता

भारतांगणातील आंदोलन जागते

विजयाची पताका घेवूनी

क्रांतीचे पर्व झुंजारते ...


अन्यायाच्या धगीला स्वातंत्र्याची आस 

क्रांतीवीरांच्या संघर्षातून घडला भारताचा इतिहास

जागला स्वातंत्र्याचा यज्ञसंग्राम

क्रांतीच्या ज्वालांतून साकारला स्वातंत्र्यसंग्राम 


लढतात भारतीय वीर जवान 

श्वासात स्वातंत्र्याचे आमरण गान

भारत मातेच्या सेवेसाठी 

झटते भारतसेना सदासर्वकाळ 


स्वातंत्र्याच्या सूरांचे गुंजन करता

दऱ्या -खोऱ्यांत ,डोंगर कपारींत

सरिता, सागरांमधूनी

हिमालय-कन्याकुमारीचे विश्व साकारते 

स्वातंत्र्याचे गीत क्रांतीचे पर्व झुंजारते ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational