महात्मा फुले
महात्मा फुले
मनी निर्मिकावर सद्भाव
पाहूनी समाजातील उच्च-नीच भेदभाव
मस्तकात विषमतेविरूद्ध क्रांतीचासूर्य
'तृतीयरत्ना' चा झाला सर्वप्रथम प्रयोग
नव्हता हा योगायोग तर
'सार्वजनिक सत्यधर्मा'चे प्रण
महात्म्याचा संघर्षाच्या प्रवासाला अनंत अडचणींचे भगदाड
विजिगीषू संघर्षयात्रीच्या विचारांना
थॉमस पेनच्या 'राईट्स ऑफ मॅन'चे स्थितप्रज्ञ बळ
समाजक्रांतीचे वाजता बिगुल
जोतिबांचे कलमरूपी भेदन
छेदूनी कुप्रथांची जळमटे
समाजकंटकांचा तिळपापड होये
जाज्वल्य इतिहासाचा पेटता हुंकार
धर्मांध व्यवस्थेचा होता पाश
'गुलामगिरी 'च्या विळख्यात खितपत पडलेला समाज
'इशारा' देत घडविला इतिहास
सत्याचे घेवूनी वज्र
'सत्सार' समाजक्रांतीचे अस्त्र
नवविचारांची घेवूनी मशाल
जोतिबा हाकतो शेतकऱ्यांच्या दुःखाचे भार
'शेतकऱ्यांचा असूड ' सूडबुध्दीचा करण्यास नायनाट
महाराष्ट्राच्या भूमीचे कराया रक्षण
शिवबांचे खड्ग धारदार
'छत्रपती शिवाजीराजे भोसले ' पोवाडा म्हणत
क्रांतीचा महात्मा करतो जयजयकार
महाराष्ट्राच्या पुरोगामी वाटचालीत
जोतिबा शिलेदार
उघडूनी शिक्षणाचे प्रवेशद्वार
तळगाळातील लोकांचा केला उद्धार
होवूनी त्यांचे वारसदार
करू या समाजाचे पुनरुत्थान
तरच महाराष्ट्राच्या पुरोगामी बिरुदावालीचे उंचावेल स्थान
