अवनीचा अनुप्रास
अवनीचा अनुप्रास
धडधडणाऱ्या धडाला धगधगत्या धैर्याची धुन
अचानक आघात, अपघात, आसमानी असो आवेश
पराक्रमाचा पाढा पाचवीला पुजला पुन्हा पास
सहनशीलता, संयमाचा संयोग साज
मानवतेच्या महामंदिराची मी मशाल
जाणीवेची जिथे जाण जनकल्याणाची जिथे जात
प्रत्येकाचा प्रहार पण पवित्रा परिरक्षणाचा पार
सोसते संकटे सदासर्वकाळ
सांज - सकाळी सर्वसमयी समानतेचा सूर
प्रदूषणाच्या पिंजऱ्यात पिछाडली प्राणीजात
'पॅरिस'च्या प्रकरणात पण पुन्हा पहिलाच प्रकार
देदीप्यमान दिल्लीच्या दैन्यावस्थेत
झुंजून झटून झगडत झाली झगमगाट
धरणीमातेच्या धीरोदत्त धैर्याने
धडधडणारे धड धीट
कर्तव्याच्या कक्षेत कटाक्षपणा काळजात
मनमंदिराच्या महानतेत माझा महतप्रवास
वसुंधरेचा वारस वाटे-वाटेत वटवृक्षाची वाट
भविष्याचा भार भरकन भर भरपूर
धरणीमातेची धारणा
धैर्य धाडसातून धीटपणा
गगनात गगनभरारी
जन्मोजन्माची जिथे जगजननी.
