STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

राजे शिवछत्रपती

राजे शिवछत्रपती

1 min
207

सोनेरी क्षण तो, 

उगवली होती रम्य पहाट 

सगळीकडे शुकशुकाट 

विजांचा कडकडाट 

ढगांचा गडगडाट करण्यास

मुघलांचा नायनाट  

जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला 

शिवनेरीवर एक तारा चमकला 

सोळाव्या शतकात मराठ्यांचा सरदार, 

हिंदवी स्वराज्याचा आधार

जिजाऊंचा वारसदार छत्रपती शिवाजी महाराज


राजे शिवाजी आपण 

काय आपली शौर्यगाथा

पावन केली मराठी माती टेकावा वाटतो क्षणभर माथा 


आपल्या कीर्ती सम कोण न साजे 

सूर्यही आपल्या प्रखर 

तेजाला लाजे 

माथ्यावरील चंद्रकोर ग्वाही देई 

हिंदवी स्वराज्य हे 

कलेकलेने वाढत जाई  

घोडदौड खणखणत्या तलवारी 

तोफ दणाणे रंगली लढाई 

माय भवानी प्रसन्न झाली 

थोर माता जिजाऊ माई  

पावित्र्य राखिले प्रत्येक धर्माचे 

प्रतिक भगवा असले 

तरी तत्त्व मात्र ऐक्याचे  

परस्त्रीस मातेसमान, 

दिला तिला हक्क

यशवंत किर्तीवंत सामर्थ्यवंत 

पुण्यवंत नीतीवंत राजे आपण 


खेळता रणसंग्राम मावळ्याची ती 

स्वामिनिष्ठ साथ 

अन सोबत गनिमी कावा

अन्यायाचा प्रहारक 

अफजलखानाचा संहारक 

गोरगरीबाचा तारक आपण 


विशाल सागरालाही घातला 

पायबंध बांधून सिंधुदुर्ग 

बाजी, तानाजी, शहीद झाले पावन झाली पावन खिंड

गडाहूनी गड जिंकले शत्रूंची आपण काढली धिंड  


आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील सर्वज्ञपणे सुशील आपण 

कित्येक झाले आणि होतील राजे असंख्य

समता बंधुता न्यायाची 

धोरणे मांडून 

काय भरारी घेतली आपण

आसमंत भेदणारी 

राजे शिवाजी होणे नाही

पुन्हा एकदा या भूवरी  

किती वण॔न करू आपले 

वण॔न करण्यास शब्दची झाले अबोल 

कार्य आपले आहे अनमोल 


साहसाची मूर्ती, 

मावळ्यांची स्फूर्ती,

त्यागाची नि राष्ट्रप्रेमाची

मिळते प्रचिती  

मिळवली अपार कीर्ती आपण

आपल्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन


(दोन ओळी कायम लक्षात ठेवा छत्रपती शिवरायांनी तुमचे भविष्य जाणले होते निदान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका...) 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational