राधाकृष्ण
राधाकृष्ण
तुझ्या डोळ्यात सारे विश्व पाहे मी,
तू माझा कृष्ण तुझीच आहे राधा मी..
मंजुळ तुझे बोलणे ऐकण्या मन आतुर होते,
तुझ्या प्रेमचेच मी गीत गाते,
स्वप्नातही तुझीच मूर्ती पाहते मी,
तू माझा कृष्ण तुझीच आहे राधा मी..
श्वास घेते जणू तुझ्याचसाठी,
बांधल्या जन्मोजन्मीच्या आपल्या रेशीमगाठी,
नाव फक्त घेते तुझेच ओठी मी,
तू माझा कृष्ण तुझीच आहे राधा मी..
तुझ्याविना जगणेच व्यर्थ वाटे,
तुझ्या सानिध्यात मी मोहरुन जाते,
हृदय माझे तुला वाहिले मी,
तू माझा कृष्ण तुझीच आहे राधा मी..
तुझ्या डोळ्यात सारे विश्व पाहे मी,
तू माझा कृष्ण तुझीच आहे राधा मी..

