STORYMIRROR

Bhagyashri Joshi

Romance Others

4  

Bhagyashri Joshi

Romance Others

मी स्वप्नखुळी

मी स्वप्नखुळी

1 min
381

सांजवेळी नदी किनारी,

बसले होते पहात मी स्वप्नखुळी..

आणाभाका घेतल्या सवे जगण्याच्या,

हातात हात गुंफूनी सुखदुःखात चालण्याच्या

धुंद होवूनी फुलत होती एक कळी,

बसले होते पहात मी स्वप्नखुळी..

नयानाच्या कोंदणी तुला बसविले,

हृदयाच्या मंदिरी तुला स्थापिले,

पाठीशी राहिले प्रत्येक वेळी,

बसले होते पहात मी स्वप्नखुळी..

कुठे माझे चुकले मला कळेना,

तुझे वागणे मला उमलेना,

जळते मन माझे अश्रू गाळी,

बसले पहात मी स्वप्नखुळी..

सांजवेळी नदी किनारी,

बसले होते पहात मी स्वप्नखुळी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance