दुःख
दुःख
ह्या विरान रानी एकटीच पडले मी,
अपमानाचे काटे सहन केले मी
दुःखाच्या दरीतून वाहत गेले मी,
सुखाच्या सागरातून दूर फेकले मी,
स्वप्नांचा माझ्या कडेलोट झाला,
दुःख नाही त्याचे क्षणभरही मजला,
तू सुखी राहावे हेच मागणे मागते देवाला,
कारण माझा प्राणच अर्पिलाय मी तुजला..

