काय अर्थ आहे?
काय अर्थ आहे?
1 min
299
नयनातील माझ्या अश्रू आटले,
काळजीचे धुके चहुबाजूने दाटले,
क्षणार्धात नात्याचे बंध तू खुंटले,
परि तू माझाच हे मनी का वाटले?
तुझे दूर जाणे खरे वाटेना,
क्षणात दूर केलेस मज हे मनासी पटेना,
तुझे वागणे मला जरा ही उमगेना,
परि तुजवरील प्रेम कणभर ही घटेना..
माझे प्रेम तू मला देशील का?
फिरुनी फक्त माझाच तू होशील का?
तुझ्याशिवाय जगणे हा विचार सुद्धा व्यर्थ आहे,
तुझ्या प्रेमाशिवाय माझ्या जिवनाला काय अर्थ आहे?
