STORYMIRROR

Bhagyashri Joshi

Others

4  

Bhagyashri Joshi

Others

गेले दिस मज तू फिरुनी देशील का

गेले दिस मज तू फिरुनी देशील का

1 min
123

स्वप्नात माझ्या तू येशील का,

गेले दिस मज तू फिरुनी देशील का..


आठवणींच्या हिंदोळी मज झूलविशी,

विरहाच्या खाईत मज लोटशी..


सारे पाश तोडूनी तू परत येशील का,

गेले दिस ते फिरुनी मज देशील का..


हिरावुनी घेतली तू स्वप्न सारी,

मम हृदय तुडवुनी ठेविले किनारी..


माझ्या सवे तू स्वप्न कवेत घेशील का,

गेले दिस ते फिरुनी मज देशील का..


मज पासूनी तू दूरदूर जाशी,

मजवरी तू का असा रुसलाशी..


आनंदाचे क्षण मजसवे वेचशील का,

गेले दिस ते फिरुनी मज देशील का..


स्वप्नात माझ्या तू येशील का,

गेले दिस मज तू फिरुनी देशील का.



साहित्याला गुण द्या
लॉग इन