STORYMIRROR

Bhagyashri Joshi

Romance

3  

Bhagyashri Joshi

Romance

अधुरा प्रवास

अधुरा प्रवास

1 min
255

तू असा अचानक आलास जीवनात,

कायमच घर केलस तू माझ्या मनात,

तुझ्या प्रेमाच्या रंगात मी अशी रंगून गेले,

माझे मी जीवनच जगणे विसरले.


तन दोन पण मनाने एक झालो,

सुखदुःखात एकमेकांच्यात समरसून गेलो,

ऊन सावलीचा खेळ ही आला जीवनात,

हसत हसत साथीने संसाराचा खेळला सारीपाट.


आयुष्यभर असाच तू मला साथीला हवास,

तुझ्या शिवाय जीवनाचा अधुरा आहे प्रवास,

तुझ्या शिवाय जीवनाचा अधुरा आहे प्रवास.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance