राधा कृष्ण
राधा कृष्ण
राधा म्हणे कृष्णाला
नको लावू नादाला
झाली प्रेमाची बाधा
भान नाही मनाला...1
ना सुचत काम काही
नटखट तू खट्याळ भारी
येता नाद बासरीचा
पावले धावतात यमुनातिरी...2
भुरळ पडली ह्रुदयात
मंत्रमुग्ध तुझी बासरी
सोडले सारे पाश
बघून तुझी चर्या हसरी...3
आस तुझ्या भेटीची
झाले मी बावरी
ध्यास तुझ्या भक्तीचा
वसे तू अंतरी...4
शाम तू सावळा माझा
मनी तुझा ठाव रे
मागणे एकच आता
तुझ्या नावापुढे घ्यावे माझे नाव रे...5