बरसला घननिळा
बरसला घननिळा


आला घेऊन सांगावा
श्रावण वारा,
येतील दाटून जशा
पावसाच्या धारा..
ओढ तुझी घननिळ्या
सागरापरी उधाणाची,
आतुर होतेय अवनी
अंतरी तुला सामावण्याची..
भास होतो रे तुझा
रातराणीपरी गंधाळल्या मातीचा,
साद घालते मी तुला
मोरपिसारा जसा फुलण्याचा...
वसुंधरेचा जणू सोहळा
साज श्रृंगाराने नटण्याचा,
पाखरांच्या ओठी गाणी
नाद ऐकू दे तुझ्या बरसण्याचा...