पुरुष
पुरुष
DBA साहित्यिक गडचिरोली
जागतिक पुरूष दिना निमित्त
विषय ..पुरुष ( सहाक्षरी)
संस्कृती आपली
पुरुष प्रधान
सर्वत्र ठिकाणी
पुरुषांना मान
कुटुंबाचा असे
खरोखरी कणा
येताची संकटे
तो साहे वेदना
कुटुंबाचा कर्ता
घराचा आधार
प्रत्येक जणांचा
साहे तोचि भार
सर्वत्र पुजते
जरी जगीं नारी
कर्तृत्वात असे
सदा तोच भारी
संसाराचा रथ
धावे भर धाव
कष्ट किती साहे
त्याचे त्याला ठाव
संसार रथाचा
बनून सारथी
सुखी कुटुंबाचा
तोचि महारथी
कष्ट तोचि करे
मातेला पुजती
दिसे ना कोणास
त्याची ती महती