STORYMIRROR

vaishali vartak

Classics

4  

vaishali vartak

Classics

मनातले बोला

मनातले बोला

1 min
370

मनातले बोला जरा

विचारांचा कोंडमारा

करु नव्हे माणसाने

उगा गैर -समजाला

स्थान मिळते अशाने    1


मनातील विचारांना

व्यक्त करुन सांगावे

पारदर्शकता हवी

मत स्पष्टच मांडावे     2


कधी केव्हा उपयोगी 

 मते होतील जनांना

 मनातील बोला जरा

वाट द्यावी विचारांना     3  


कोंडमारा करण्याची

नाही कधीच गरज

मनातील बोला जरा

प्रश्न सुटती सहज        4


स्पष्ट व्यक्तता हवीच

 मनी कुढणे अयोग्य 

 नको गप्पच रहाणे

आरोग्यास नसे योग्य    5


शब्द येतात धावत

मदतीसाठी मनाला 

व्यक्त करी भाव मनीचे 

वाटे हलके जीवाला 6


न बोलताची व्यथा 

राहणार दडून मनी

कसे कळणार जनांना

काय लपलय अंतर्मनी 7


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics