STORYMIRROR

vaishali vartak

Action

3  

vaishali vartak

Action

भेट शब्दातून

भेट शब्दातून

1 min
9

फुले माळली कुंतली

गळ्यात शोभे चंद्र हार

रंग अबोली अंगी खुलला

रुपवती दिसतेय नार.        १


पत्र मिळताची,आली खुशीत 

अधीर मने , करीते वाचन 

भाव मनीचे खुलले गाली 

नारी गुंतली करण्या लेखन.    २


कशी बैसली नटूनी-थटूनी

घेऊनिया हाती लेखणी 

काय लिहू, करी विचार मनी

खूश मने, दिसे देखणी.       ३

 

केले कितीदा, पत्राचे पारायण 

शब्दा शब्दांनी, मन उल्हासित  

किती कौतुकाचे, सारे शब्द 

ऊडुऊडू मने नारी आनंदित       ४


वाचण्यात विसरली भान

लिखाणास शब्द आले अधरी

चहाचा कप तसाच ठेवूनी

विचारांचा गुंता, सोडवी अंतरी.   ‌‌५

 

आनंदमय , तिज सकाळ,

पहा गुलाब गाली फुलले

शब्दातून भेटला तिचा सखा 

गुज मनीचे तया उमजले.      ६



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action