Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jayashree Kelkar

Tragedy

4.5  

Jayashree Kelkar

Tragedy

पुनश्च आक्रंदन

पुनश्च आक्रंदन

1 min
504


काय अपराध माझा जात,धर्म असतील सर्व फसवे,

केवळ अबला म्हणून वागवता, तिच्या यातनांना अंत नसे !


मुलगी असे दोष आमुचा

तो तर जन्मालाच उरे,

पौरुष सिद्ध करण्या का तुम्ही आमचा बळी घेतला रे !


तुम्ही तर भाकड देवाच्या अंगणी, हे तुम्हा कसे करवीतसे,

आया बहिणी कशा काय तुम्हा त्यावेळी न आठवीतसे !


निर्भया निर्भया गजर केलात 

काय उपयोग त्या सर्वाचा,

शेवटी गेलाच ना बळी अजून एक ,ऊपयोग काय त्या न्यायाचा !


अजून किती वाट लावणार त्या निरागस सुकुमार कळ्यांचा,

अब्रू ,लक्तरे वेशीवर टांगून का अपमान करीशी आपुल्याच धर्माचा !


मरेस्तोवर ताबडतोब शिक्षा,एकच त्याला दंड असे ,

 त्वरित न्याय मिळावा ही एकच इच्छा मनी वसे !


 एकजुटीने प्रयत्ने करुनि न्याय मागण्या सिद्ध असे,

अशी वेळ पुन्हा न यावी 

हीच करुणा भाकीतसे ,

हीच करुणा भाकीतसे !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy