पुनर्जन्म..!
पुनर्जन्म..!
लावलीस आग मजला,
जरी जळालो पुरता मी,
आपत्ती इष्ट नियतीची,
जन्म नव्याने जगतो मी..!
वीज पडली संकटांची,
त्यात भाजून निघालो मी,
जल संजीवनी मिळाली,
भरभरून वाढलो मी..!
केला घात वीज वर्षाने,
होरपळून झुरलो मी,
सांभाळले भिज वर्षाने,
सावरलो अंकुरलो मी..!
वाट आडवली धोंड्यांनी,
येण्या आधीच संसारी मी,
झालो शिकून हो शहाणा,
ती ठेच लागल्यावरी मी..!
पोखरले जरी दुःखाने,
दिसे पोकळ परि पूर्ण मी,
अन् थाटून बसलो दुकाने,
वाटण्या सुखे चैतन्य मी..!