STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

पुनर्भेट

पुनर्भेट

1 min
236

किती तरी दिवसांनी , अचानक तू दिसलीस

मनात लक्ष चांदण्यांची , फुले फुलवलीस

मरगळलेल्या मनाला माझ्या , चैतन्य आणलेस

मनोपटलावरचे मळभ , नाहीसे केलेस


कॉलेजचे दिवस आपले , होते सोनेरी 

माझ्या मनीमानसी , तूच होतीस परी

जगच होते आगळेवेगळे , धुंद तू नि मी

अद्वैतातच रममाण आपण , एकरुप तू नि मी


डोळ्यांंची भाषा , डोळ्यांनाच कळली 

मधुर हास्याची , देवाणघेवाण झाली

नव्हता तेव्हा , पुढे गेलेला जमाना

हळूहळू जमत गेला , प्रीतीचा तराणा


मनात एकमेकांच्या , प्रतिमा कोरली

रिती माझी ओंजळ , तू प्राजक्ताने भरली

टवटवीत अन् सुगंधी प्रीत ,एकमेकांना दिली

पण अचानक कोणाची तरी , दृष्ट लागली


आज पुनर्भेटीचा आनंद , मावत नाहीये डोळ्यांत 

हसू तसेच उमलते आहे , हळूवार ओठांत

भलीमोठी लक्ष्मणरेषा , आहे आपल्या दोघांत

पण भावनांची उजळणी , कवितेच्या ओघात 


दोन ओंडक्यांप्रमाणे , जीवनसागरात दूर गेलो

माजी विद्यार्थी संघामुळे , आज तरी भेटलो

भेटीचा आनंद , चवीचवीने घ्यायचा आहे

डोळ्यांच्या मीलनाने, पुनर्भेट फुलवायची आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract